🌿 मधुमेह / शुगर म्हणजे काय?
कारणे, लक्षणे आणि नैसर्गिक उपाय
🩸 मधुमेह म्हणजे काय?
मधुमेह (Diabetes) हा असा दीर्घकालीन आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण (Blood Sugar Level) वाढते. शरीरातील स्वादुपिंड (Pancreas) इन्सुलिन नावाचे हार्मोन तयार करते. हे इन्सुलिन शरीरातील साखर पेशींमध्ये पोहोचवण्याचे काम करते.
इन्सुलिन कमी प्रमाणात तयार झाल्यास किंवा योग्य प्रकारे कार्य न केल्यास रक्तातील साखर वाढते आणि त्यालाच मधुमेह म्हणतात.
🔎 मधुमेह होण्याची कारणे
▪️ चुकीचा आहार 🍔
जास्त गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बेकरी, फास्ट फूड, कोल्डड्रिंक यांचे जास्त सेवन.
▪️ व्यायामाचा अभाव 🚶♂️
बैठी जीवनशैली आणि शारीरिक हालचालींची कमतरता.
▪️ लठ्ठपणा ⚖️
अधिक वजनामुळे इन्सुलिन नीट कार्य करत नाही.
▪️ अनुवंशिक कारणे 👨👩👧👦
घरात मधुमेह असल्यास धोका वाढतो.
▪️ मानसिक ताण 😟
ताणतणावामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊन साखर वाढू शकते.
▪️ अपुरेशी झोप 😴
अनियमित झोपेमुळे शरीरातील साखरेचे संतुलन बिघडते.
⚠️ मधुमेहाची लक्षणे
वारंवार लघवी होणे
खूप तहान लागणे
वारंवार भूक लागणे
थकवा जाणवणे
वजन अचानक कमी होणे
जखमा उशिरा भरून येणे
तळपायाला जळजळ / आग होणे
डोळ्याला कमी दिसणे
ही लक्षणे आढळल्यास त्वरित रक्त तपासणी करावी.
🌿 शुगर कंट्रोल करण्यासाठी नैसर्गिक उपाय
🔰 कारले (Bitter Gourd)
कारल्यामध्ये रक्तातील साखर कमी करण्याची क्षमता असते.
👉 सकाळी उपाशीपोटी ½ कप कारल्याचा रस घ्यावा.
🔰 मेथी दाणे
मेथी दाणे इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात.
👉 १ चमचा मेथी दाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्या.
🔰 जांभूळ बियांचे चूर्ण
जांभूळ बिया वाळवून त्याचे चूर्ण तयार करावे.
👉 रोज १ चमचा कोमट पाण्यासोबत घ्यावे.
🔰 दालचिनी
दालचिनी इन्सुलिन कार्यक्षमता सुधारते.
👉 अर्धा चमचा दालचिनी कोमट पाण्यात मिसळून घ्या.
🔰 नियमित व्यायाम आणि योग 🧘♂️
✔️ रोज 30 मिनिटे चालणे
✔️अनुलोमविलोम, कपालभारती, मंडूकासन हि योगासने करणे गरजेचे आहे
✔️ वजन नियंत्रण
✔️ संतुलित आहार
🥗 शुगर पेशंटसाठी आहार मार्गदर्शन
जास्त फायबरयुक्त अन्न (भाज्या, सलाड)
ज्वारी / बाजरी / नाचणी
कमी मीठ, कमी साखर
जंक फूड टाळा
दिवसातून थोडे थोडे खा
🩺 महत्वाची सूचना
✔️ नियमित Blood Sugar तपासणी करा
✔️ डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे बंद करू नका
✔️ आयुर्वेदिक उपाय पूरक म्हणून वापरा
🌿 आपले आरोग्य आपल्या हाती
