काजू चुकीच्या वेळी खाऊ नका

आरोग्य

काजू एक पौष्टिक आणि स्वादिष्ट सुकामेवा. अनेक मिठाया, भाज्या किंवा स्नॅक्स मध्ये याचा वापर होतो. पण काजू जितके शरीरासाठी फायदेशीर असतात, तितकेच ते काही चुकीच्या पध्दतीने खाल्ले तर आरोग्यावर दुष्परिणाम देखील करू शकतात. विशेषतः गरम पदार्था बरोबर काजू खाणे टाळले पाहिजे. कारण यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका निर्माण होतो, जो अनेक गंभीर आजारांचे कारण ठरू शकतो.

गरम अन्नपदार्था बरोबर काजू खाल्ल्यास शरीरातील उष्णता अधिक प्रमाणात वाढते. काजू मध्ये आधीच नैसर्गिक उष्णता असते आणि ती गरम अन्नाबरोबर मिळाल्यावर रक्तदाब अचानक वाढू शकतो. विशेषतः ज्यांना आधीच BP ची तक्रार आहे, त्यांनी ही सवय नक्कीच टाळावी. रक्तदाब अचानक वाढल्यास हृदयावर ताण येतो. दीर्घकालीन असे रक्तदाबाचे चढ-उतार हृदयविकार, थकवा, डोकेदुखी अशा अनेक लक्षणांना निमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे आरोग्याचं भान ठेवून काजू नेहमी योग्य वेळीच खावेत.

काजू खाण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळचा नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळी हलक्या खाण्यासोबत. थंड पदार्था बरोबर किंवा साध्या अन्नाबरोबर काजू खाल्ले तर शरीराला पोषण मिळतं आणि कोणतेही साईड इफेक्ट होत नाही. काजू गरम दूध, मसालेदार जेवण, किंवा गरम सूप सारख्या पदार्था बरोबर खाणं टाळा. यामुळे शरीरात जळजळ, उष्णता, आणि BP चा त्रास वाढण्याची शक्यता असते. काजू आरोग्यासाठी उत्तम आहेत, पण ते खाण्याची वेळ आणि पध्दत चुकीची असेल, तर ते हानिकारकही ठरू शकतात.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *